Tuesday, June 25, 2024
Homeदेश विदेशCBSE बोर्डाचा १२ वी चा निकाल जाहीर

CBSE बोर्डाचा १२ वी चा निकाल जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईने सोमवारी, १३ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. २०२४ चा सीबीएससी बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल ८७.९८ टक्के लागला आहे. यंदाच्या ही निकालमध्ये मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. सीबीएसई बोर्डात यंदा ९० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाचा इयत्ता १२वी निकाल जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

यंदा मार्च २०२४ च्या १२ वी परिक्षेसाठी सीबीएससीमध्ये १६,३३,७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल १६,२१, २२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४,२६,४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या निकालात या वर्षी २४ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

तर, १ लाख १६ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा एकुण ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १.१६ लाखांपेक्षा जास्त ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा उत्तीर्ण परीक्षार्थी होण्याचे प्रमाण ८७.९८ टक्के आहे. गेल्या वर्षी, १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी १२वीची परीक्षा दिली होती, ज्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ८७.३३ टक्के होती.

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीच्या टक्केवारीत यंदा मागील वरचीच्या तुलनेत वाढ झाली आहे. २०२३ मध्ये ९०. ६८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या तर यावर्षी टक्केवारी ९१.५२ इतकी आहे. दुसरीकडे मुलांच्या बाबतही यंदा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढला आहे. गेल्या वर्षी ८४.६७ टक्के विद्यार्थी (मुले) उत्तीर्ण झाली होती तीच टक्केवारी यंदा ८५. १२ इतकी आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा ५० टक्के आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६० टक्के होते. यंदा सुद्धा ६.४० टक्क्यांनी मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली आहे.

निकाल कुठे बघता येणार?
परीक्षार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात. यासह DigiLocker वेबसाइट – digilocker.gov.in आणि UMANG ॲपवर सुद्धा आपल्याला निकाल तपासता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या