Thursday, May 21, 2026
Homeदेश विदेशबांधकाम सुरू असलेली इमारत पत्त्यासारखी कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती… VIDEO व्हायरल

बांधकाम सुरू असलेली इमारत पत्त्यासारखी कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती… VIDEO व्हायरल

बंगळुरू। Bengaluru

बंगळुरूमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. बंगळुरू पूर्व येथे हन्नूर येथे एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळे बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाच्या दोन रेस्क्यू व्हॅन बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इमारतीत १७ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि एजन्सींच्या मदतीने समन्वित प्रयत्नात बचाव कार्य केले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हाभरात औषधांची 8300 दुकाने बंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ऑनलाईन फार्मसी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि औषध विक्रीतील अनियमित सवलतींना आळा घालण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंद आंदोलनाला बुधवारी...