Saturday, May 4, 2024
Homeनाशिकआज बलिप्रतिपदा - पाडवा व भाऊबीजचा एकत्रीत योग

आज बलिप्रतिपदा – पाडवा व भाऊबीजचा एकत्रीत योग

नाशिक | Nashik

अश्विन अमावस्येच्या किर्द काळोखाला लक्ष लक्ष दिपांच्या प्रकाशाने दूर सारत सुरू झालेल्या प्रकाश पर्वात सोन पावलांनी आलेल्या लक्ष्मीचे मनोभावे पुजन झाले.

- Advertisement -

यानंतरच्या यंदा दिवाळीत उद्या (दि.16) बलीप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, गोवर्धन पुजा व भाऊबीज असे सण एकत्रीत आल्याचा दुर्मिळ योग येत आहे.

या सणानिमित्त विशेतष: बळीराजा पुजनची तयारी शेतकर्‍यांकडुन व भाऊबीजेची तयारी माहेरवासिन यांच्याकडुन करण्यात आली आहे. या सणांमुळे बालगोपालांना मामाच्या गावाला येण्याची उत्सुकता भाऊबीजेने संपणार आहे.

दिपावली सणात कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा सण साजरा केला जातो. याच सणाच्या दिवशी ’इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणण्याची प्रथा आहे.

या दिवशी

या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढत, त्याची पूजा करतात. दिंदु सणांतील शुभ मुहूर्ताच्या साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

बळीराजा प्रतिक शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातो. ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.

अशाप्रकारे हा दिवस लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. यानुसार सण साजरा करण्याची तयारी बळीराजाकडुन करण्यात आली. तसेच दिवाळी पाडव्या निमित्त पहाटेस मराठी संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने भावगिते, भक्तीगित, संगित कार्यक्रम घेतले जातात.

यादृष्टीने सामाजिक मंडळांकडुन तयारी करण्यात आली आहे. या शुभ मुहूर्तावर आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा हा नववर्षाची सुरुवात करतात.

लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या पाडव्याच्या दिवशी करतात. या नवीन वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजन करतात. यानुसार व्यापार्‍यांनी तयारी केली आहे.

कार्तिक शुद्ध द्वितीयेस येणार्‍या भाऊबीज सणाची बहिणीची प्रतिक्षा उद्या संपणार आहे. सासरवासिण बहिण ही दिवाळीच्या प्रकाश पर्वात भावासाठी स्नेहबंधन अधिक घट्ट करण्यासाठी माहेराला येते.

बंधु-भगिनींचा हा सण प्रेमसंवर्धनाचा मानला जातो. या सणाच्या निमित्ताने भाच्यांना मामाकडे सुटट्ीच्या निमित्ताने येऊन आनंद लुटण्यासाठी मोठी संधी मानली जातो. या सणानिमित्त पुन्हा एकदा बाजारपेठेत चैतन्य दिसुन येते.

- Advertisment -

ताज्या बातम्या