Thursday, May 2, 2024
Homeजळगावमोहरम साध्या पध्दतीने साजरा करा !

मोहरम साध्या पध्दतीने साजरा करा !

जळगाव – Jalgaon

कोविड-19 (Covid-19) मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा मोहरम (Moharram) साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहिर करण्यात आल्या आहेत. त्याचे सर्वांनी पालन करुन साध्या पध्दतीने साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut) यांनी केले आहे.

- Advertisement -

यावर्षी मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी दिनांक 18 ऑगस्ट, 2021 रोजी शहादत की रात तसेच योम-ए-आशुरा 10 व्या दिवशी दिनांक 19 ऑगस्ट, 2021 येत असून त्यानिमित्त मात्तम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूक काढता येणार नाही.

यावर्षी मोहरम महिन्याच्या 9 व्या दिवशी दिनांक 18 ऑगस्ट, 2021 रोजी शहादत की रात तसेच योम-ए-आशुरा 10 व्या दिवशी दिनांक 19 ऑगस्ट, 2021 येत असून त्यानिमित्त मात्तम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूक काढता येणार नाही.

कोविड (Covid-19) काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. सोसायटीमधील नागरीकांनी देखली एकत्रित मातम/दुखवटा करु नये. वाझ/मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावे. ताजिया/आलप, ताजिया/आलम काढु नयेत. सबील/छबील बांधण्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्याठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोणातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीने पाण्याचे वाटप करावे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.

(Covid-19) कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या काळात आणखी काही मार्गदर्शक सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असेही श्री.राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या