Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedश्रीचक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय पातळीवर साजरा करा 

श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन शासकीय पातळीवर साजरा करा 

औरंगाबाद- Aurangabad

मराठी भाषेचा आद्यग्रंथ लीळाचरित्र लिहून महानुभाव पंथाची स्थापना करणाऱ्या श्रीचक्रधर स्वामी (Shri Chakradhar Swamy) यांचे यंदा अष्टशताब्दी वर्ष असून यानिमित्ताने २९ ऑगस्ट हा दिवस शासकीय पातळीवर देखील अवतार दिन म्हणून साजरा व्हावा अशी विनंती करणारे निवेदन ग्लोबल महानुभाव संघाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना देण्यात आले. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच आल्याबद्दल महानुभाव पंथाचे सुदर्शन महाराज कपाटे महानुभाव यांनी सत्कार करण्यात आला.  

- Advertisement -

राज्याची धुरा सांभाळल्यावर पहिल्यांदाच शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेऊन सुदर्शन महाराज कपाटे महानुभाव यांनी महानुभाव पंथाच्या वतीने सुरू असलेल्या राष्ट्र उभारणीच्या कार्याची माहिती दिली. श्रीचक्रधर स्वामींनी (Shri Chakradhar Swamy) स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत आद्यग्रंथ लीळाचरित्र या मायमराठीला दिले.

देशभरात पसरलेले अनुयायी श्रीचक्रधर स्वामींचा (Shri Chakradhar Swamy) अवतार दिन साजरा करतात. राज्य शासनाच्या वतीनेही हा अवतार दिवस साजरा व्हावा, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याविषयी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

आमदार अतुल सावे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या