Monday, May 19, 2025
Homeधुळेखंडोजी महाराज यात्रोत्सवात पायदळी सोंगची पर्वणी

खंडोजी महाराज यात्रोत्सवात पायदळी सोंगची पर्वणी

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

- Advertisement -

येथील खंडोजी महाराज यात्रोत्सवानिमित्त (Khandoji Maharaj Yatrotsav) दररोज पायदळी सोंगाची (Padali Song) पर्वणी असून भाविकांची मोठी गर्दी होते आहे. यात्रोत्सवानिमित्त उद्या दि. 5 रोजी गोपाळकाला व कुस्त्यांची दंगलीचे (Gopal Kala and the riot of wrestlers) आयोजन करण्यात आलेे.

येथील ऐतिहासिक खंडोजी महाराज यात्रोत्सवाला 28 ऑगस्टपासून प्रारंभ झाला. यात्रोत्सवात कलागुणांचा अविष्कार दाखवणार्‍या मंडळांकडुन पायी सोंगच्या डफ, तुतारीच्या ठेक्यावर यात्रेकरूही नाचण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. तर प्रत्येक सोंग विठ्ठल मंदिरात मानवंदना देण्यासाठी जातात.

विठ्ठल मंदीराचे ह.भ.प.योगेश्वर महाराज प्रत्येक सोंगाचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करतात.काल रात्री बालाजी मंदीरातर्फे विठ्ठल, रूख्मिणी व संताचा मेळा घेऊ नृत्य सादर करण्यात आले. तर जागृती मंडळातर्फे श्रीकृष्ण जन्म ते श्रीकृष्ण लिला सादर करण्यात आली. न्हावी गल्लीतर्फे श्री कालिका देवीने राक्षसांचा वध करण्याचे सादरीकरण केले. भोई गल्लीतर्फे डाखिन व दैत्यांचा हैदोस सादर करण्यात आला.

मराठा पाटील समाजातर्फे चंद्र, सुर्याचे नृत्य तर महात्मा फुले चौक माळी गल्लीतर्फे नरसिंहाचे नृत्य व लंकापती रावणाचे नृत्य सादर केले गेले. तसेच कलीयुग मित्र मंडळ नाना चौकतर्फेही नृसिंह नृत्य सादर करण्यात आले. इंदीरा नगर एकलव्य मित्रमंडळानेही सिंहरूपी नरसिंह नृत्य सादर केले.

रात्रभर, पिंपळनेर शहरात डफ, तुतारी वाद्यांचा आवाजाबरोबर खंडोजी महाराज की जय घोषणा ऐकु येत होत्या. भाविकांनी यात्रेत मनमुराद यात्रेत आनंद घेतला. तर आज कुस्त्यांची दंगल झाली. तसेच पालखी सोहळा, जागरण व पायी सोंग, टॅक्टरवरील वहनांचा कार्यक्रम झाला. उद्या दि. 5 रोजी गोपाळकाला व कुस्त्यांची दंगल होईल.

यावेळी मल्लही दाखल झाले आहेत. तसचे दि. 6 रोजी पारंपारिक नृत्य स्पर्धा होवून नामसप्ताहाची सांगता होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : कैद्यांसोबत पोलिसांची हॉटेलमध्ये ‘पार्टी’; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा छापा, चौघांची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik कारागृहातील (Jail) न्यायालयात (Court) बंदीवानांना सुनावणीला हजर करण्यासाठी नेमलेल्या पोलीस पथकातील चार अंमलदारांनी खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांसोबत हॉटेलात मटणावर ताव मारत...