Saturday, May 4, 2024
Homeजळगावसेल, मोबाईल आणि... काळजाला भिडणारी माणुसकीची गोष्ट!

सेल, मोबाईल आणि… काळजाला भिडणारी माणुसकीची गोष्ट!

सामान्यत: आजू-बाजूच्या भवताल एखादा संवेदनशील मनाला अस्वस्थ करतो. विनाशकारी जीव घेण्या कोरोना संसर्गामुळे संपुर्ण जगात उडालेला हाहाकार निष्पात जिवलगांना गमावल्याचे दु:ख- प्रचंड गरीब- श्रीमंत प्रत्येकाला या विळख्याने गिळंकृत केले. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांचे उद्धवस्थ झालेले संसार, रोजगार गेल्यामुळे भाकरीचा चंद्र शोधतांना झालेली मध्यमवर्गीय, सर्वसामान्यांची परवड यामुळे वेदनेशी घट्ट नाते सांगणारा जळगवातील जिगरबाज रंगकर्मी आतून खुप अस्वस्थ होतो. आणि काळजीतील वेदना कागदावर मांडतो आणि त्यातूनच निर्माण होतेे रसिकांच्या काळजाला भिडणारी माणुसकी धर्म शिकविणारी सेल, मोबाईल आणि ….

ही दोन अंकी कोरोनाकाहातील करुण काळी कहाणी. प्रत्येकाच्या वेदेनाचा हुंकार-वरकरणी हलकी-फुलकी वाटणारी पण वस्तुत: गंभीर जातकुळ असणारी आणि हासता हासता अंतर्मुख करणारी कधमी रडविणारी ही भिडणारी माणुसकीची गोष्ट ही नाट्यकृती सादर केली होती. जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयाने. भिडणारी नाट्यसंहिता स्वत:ाच्या संहितेवर परिश्रमपुर्वक केलेले दिग्दर्शक हनुमंत सुरवसे यांचे नाट्यसंस्कार, मध्यवर्ती आनंदाचा भुमिकेत केलेले समर्थ अभिनय सहकलावंतांची समर्थसाथ सोबत तंत्रज्ञानाची भक्कम साथ यामुळे प्रस्तृत नाट्यप्रयोग रेकॉर्डबे्रड गर्दी चांगल्यापैकी भावला आणि भिडणारी असो!

या नाटकाची कथा ही चाळीत राहणार्‍या सासगी कंपनीत काम करणार्‍या आनंदची (हनुमान सुरवसे) आहे. लॉकडाऊनच्या काळात जवळपास सर्वांचीच आर्थिक परिस्ति खालावली मध्यमवर्गीय- सामान्यांना याचे चटके तीव्रतेने सहन करावे लागले. आनंदचा स्वत:चा पंचकोनी परिवार आहे. कोरोनामुळे आई गमावली आहे. परंतु म्हातारे वडील-आजोबा (श्रीकांत चौधरी) हृदयविकाराने पिडीत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत बायको शालिनीची (विशाखा बाविस्कर) खंबीर साथ आहे.

- Advertisement -

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलचा हट्ट धरणारे लेकरं मुलगा मंगेश (हेमंत माळी) तर मुलगी पिंकी (तन्वी काटकर) आहेत. समदु:खी चाळकरी शेजारी बादशाह (रोहन काटे), शेजारी वहिनी (संजना तायडे), दक्षिणाचा आयप्पा (यश गोडसे), मंगेशचा मित्र पका (प्रसाद कांबळे), पिंकीची मैत्रिण किमी (किमया बिर्‍हाडे), बचत गटातील महिला सहकारी सोना (राजश्री मनोहर), शांताबाई (जानव्ही पाटील) हे सगळे आनंदाच्या सुख दुख:चे भागीदार, साथीदार लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्या आनंदला माणुसकीच्या नात्याने वेळीच आर्थिक, मानसिक, आधार देत त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवतात. म्हातार्‍या आजोबांनी योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे जीवदान मिळते.

मंगेश पिंकीला नवीन मोबाईल मिळतो. रेडीओ दुरुस्त होवून नवीन सेलही येतो. आणि आनंदचा पांडूरंग निवास खर्‍या अर्थाने आनंदाने न्हाऊन निघतो आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे म्हणत हा काळजाचा ठाव घेणारा माणुसकी धर्म शिकविणारा नाट्यप्रयोग संपतो.

या रगकर्मींचा रंगमंचावरील आत्मविश्वासपुर्वक वावर कौतुकास्पद! तांत्रिकबाबतीत सोहम परणकर (प्रकाश योजना), परिणामकारक-धनराज सापन यांचे पार्श्वसंगीत सादरीकरणाची गती वाढविणारे सुनिल परदेशींची रंगमंच मांडणी, संहितेची गरजपुर्ण करणारी सागर भडंगर (रंगभूषा, शुभांगी सुरवसे (वेशभूषा), पात्रांना अनुरुप संजय कासार, चेतन मगरे, जय सोनार यांची व्यवस्था व्यवस्थित (फक्त प्रसंग व प्रवेश वादळाच्या वेळी थोडी धांदल उडाली), डॉ. एन.जे. पाटील, डॉ. आर. बी. संदानशीव, रंगकर्मी अनिल मोरे यांचे सहकार्य मोलाचे. निर्मिती प्रमुख प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुखांचे नाट्यकर्मींना प्रोत्साहन, सांघिक कामगिरीस पोषक व पुरक.

एकूणात हालगीसम्राट फेम रंगकर्मी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता हनुमान सुरवसे आणि टिमने स्पर्धेच्या मध्यावर काळजाला भिडणारा नाट्यानुभव दिला हे अगदी निर्विवाद!

- Advertisment -

ताज्या बातम्या