Thursday, July 23, 2026
Homeनाशिकनवीन कसारा घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून अपघात; दोन जण जागीच...

नवीन कसारा घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून अपघात; दोन जण जागीच ठार

इगतपुरी | प्रतिनिधी
मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात सिमेंट वाहतूक करणारा ट्रक खोल दरीत पडल्यामुळे अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या बाबत अधिक माहिती अशी की, नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंटजवळ सिमेंटने भरलेला ट्रक मुंबईकडे होता. याच वेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून हा ट्रक थेट दरीत कोसळला. शुक्रवार दि. २१ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.

ह्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. अपघातामुळे दरीत सिमेंट पसरले असून ट्रकचा चक्काचूर झाला आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलिंग टीम व कसारा शहापुर येथील आपत्ती टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु करून त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर कडून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात MH18 BG 9004 ह्या ट्रकचा चालक सौद अहमद अन्सारी वय २८ रा. मालेगाव व त्याचा सहकारी अब्दुल मजीद अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले आहेत.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...