Tuesday, April 28, 2026
HomeनगरAhilyanagar : जनगणनेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना 4 ते 6 मार्चदरम्यान प्रशिक्षण

Ahilyanagar : जनगणनेतील अधिकारी-कर्मचार्‍यांना 4 ते 6 मार्चदरम्यान प्रशिक्षण

एक एप्रिलपासून प्रत्यक्ष घरगणना || जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त प्रधान जनगणना अधिकारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

2011 नंतर तब्बल 16 वर्षांनी देशात जनगणना 2027 होणार आहे. करोना काळामुळे रखडलेल्या जनगणेची ही प्रक्रिया आता वेग घेत आहे. जिल्ह्यात घर यादी, घर गणनेला सुरुवात झाली असून प्रशिक्षित प्रगणक घराघरांत जाऊन माहिती संकलित करणार आहे. यावेळी जनगणनेत 33 महत्त्वाचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहे व सर्व माहिती मोबाइल अ‍ॅपद्वारे ऑनलाइन नोंदवली जाईल. जिल्ह्यात 1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या जनगणनेसाठी पुढील आठवड्यात नगरला 4 ते 6 मार्चदरम्यान जनगणनेचे काम करणारे अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात सद्यस्थितीत हाऊस लिस्टींग ब्लॉक (एचएलबी) अंतर्गत कामे सुरू असून, साधारणपणे 150 ते 200 घरे आणि 700 ते 800 लोकसंख्येचा एक एचएलबी (गट) तयार करण्यात येत आहे. जनगणनेदरम्यान प्रगणक नागरिकांना घराची रचना, सुविधा, कुटुंबाची रचना, शिक्षण, संपर्क सुविधा यासह विविध सामाजिक-आर्थिक बाबींवर प्रश्न विचारणार आहेत. तसेच याबाबतची माहिती थेट मोबाइलमधील प्रगणकाच्या अ‍ॅपमध्ये नोंदवली जाईल. या सर्व प्रक्रियेवर प्रधान जनगणना अधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे. या जनगणनेतील सर्वात महत्त्वाचा व चर्चेचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदाच जातनिहाय नोंदीचा आहे. कुटुंबप्रमुख अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्गातील आहे का, याची अधिकृत नोंद केली जाणार आहे. यामुळे भविष्यातील धोरणे, विकास आराखडे आणि शासकीय योजनांचे नियोजन अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात 1 एप्रिलपासून जनगणना सुरु होईल. त्यापूर्वी संबंधित तहसीलदार व सीओ तालुक्यातील प्रगणकांची नियुक्ती करतील, प्रगणक हे शासकीय व निमशाकीय कर्मचारी राहणार आहे आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात नगरला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 4 ते 6 मार्चदरम्यान जनगणेत सहभागी होणार्‍या अधिकारी- कर्मचारी यांना जनगणना संचालयानाचे अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यासाठी मास्टर टेर्नर यांची नियक्ती करण्यात येणार आहे.

विवाहित जोडप्यांची संख्या किती
प्रगणकांद्वारे घरातील खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत व उपलब्धता, प्रकाशाचा स्रोत, शौचालय व स्नानगृहाची उपलब्धता, सांडपाणी निचरा व्यवस्था, स्वयंपाकघर व एलपीजी/पीएनजी कनेक्शन, तसेच स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे.

आधुनिक सुविधांचीही घेणार माहिती
जनगणनेत रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, लॅपटॉप किंवा संगणक, दूरध्वनी, मोबाइल व स्मार्टफोनची उपलब्धता, तसेच सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनांची माहिती नोंदवली जाणार आहे. कुटुंबात वापरले जाणारे मुख्य धान्य आणि जनगणनेशी संबंधित संवादासाठी मोबाइल क्रमांकही विचारला जाईल.

नगर जिल्ह्यात 30 चार्ज
नगर जिल्ह्यात 14 तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार आणि नगर पालिका- नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासह नगर शहरात मनपा आयुक्त व त्यांचे चार प्रभाग अधिकार्‍यांचे मिळून 30 चार्ज राहणार आहे. यातील प्रत्येक चार्ज (भागात) स्वतंत्रपणे जनगणना राबवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच...