Tuesday, March 25, 2025
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्यात 8 लाख एससी, एसटीची लोकसंख्या

Ahilyanagar : जिल्ह्यात 8 लाख एससी, एसटीची लोकसंख्या

2011 च्या गणनेनुसार गट-गणनिहाय माहिती सरकारला सादर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

2011 च्या जनगणनेनुसार नगर जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या 8 लाख 1 हजार 288 असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या नवीन रचनेसाठी राज्य पातळीवरून याबाबत जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागवण्यात आली. तालुका पातळीवरून संकलित केलेल्या या माहितीत नगर जिल्ह्यात 8 लाख एससी आणि एसटीची लोकसंख्या असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, फेबु्रवारी महिन्यात जिल्ह्यातील पुढील पाच वर्षांचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सरकार पातळीवरून ओबीसी लोकसंख्येची माहिती मागवण्यात आली होती. ही जिल्हा प्रशासनाने सादर केल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद गट आणि गणाच्या रचनेसाठी नव्याने ग्रामीण लोकसंख्येची माहिती मागवण्यात आली होती.

- Advertisement -

ही माहिती मागवताना ओबीसी प्रवर्गाला मात्र बाजूला ठेवण्यात आले आहे. महसूल विभागाच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2011 च्या जनगणेनुसार मागासवर्गीयांची लोकसंख्या सरकार पातळीवर सादर केली आहे. यात जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद वगळून ग्रामीण भागात 36 लाख 9 हजार 28 लोकसंख्या दाखवण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील जिल्ह्यात सरपंच पदाच्या आरक्षणासाठी याबाबत माहिती घेण्यात आली होती. त्यावेळी निश्चित करण्यात आलेल्या आकडेवारी आणि आताच्या आकडेवारीत काही प्रमाणात फरक दिसत आहे.

फेबु्रवारी महिन्यांत तयार करण्यात आलेल्या आकडेवारीत नगर जिल्ह्यात 36 लाख 53 हजार 339 ग्रामीण लोकसंख्येचा अंदाज व्यक्त करून त्यात 4 लाख 47 हजार 695 अनुसूचित जातीची, तर 3 लाख 55 हजार 374 अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवण्यात आली होती. आता सुधारित आकडेवारीत जिल्ह्यात 4 लाख 44 हजार 548 अनुसूचित जातीची आणि 3 लाख 56 हजार 740 अनुसूचित जमातीची लोकसंख्या दाखवण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या अहवालात जिल्ह्याच्या 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण क्षेत्राची तालुकानिहाय लोकसंख्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या तुलनेत बरोबर असून ती निश्चित करताना जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या क्षेत्रातील कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही. तसेच महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती छावणी क्षेत्र आदी नागरी भागातील लोकसंख्येला यातून वगळण्यात आलेले आहे. त्यानुसार नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आठ लाख अनुसूचित जाती जमातीचे लोकसंख्या असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

अशी आहे मागासवर्गीय लोकसंख्या
अहिल्यानगर 46,322 जाती आणि 10 हजार 23 जमाती, पारनेर 18 हजार 227 जाती 16 हजार 924 जमाती, पाथर्डी 22 हजार 601 जाती आणि 3 हजार 900 जमाती. शेवगाव 31 हजार 193 जाती आणि 4 हजार 243 जमाती. राहुरी 23 हजार 306 जाती आणि 30 हजार 45 जमाती. राहाता 43 हजार 852 जाती आणि 17 हजार 829 जमाती. संगमनेर 37 हजार 328 जाती 50 हजार 588 जमाती. कोपरगाव 28 हजार 317 जाती आणि 32 हजार 801 जमाती. नेवासा 49 हजार 235 जाती आणि 1 हजार 667 जमाती. श्रीरामपूर 38 हजार 774 जाती आणि 17 हजार 583 जमाती. अकोले 16 हजार 670 जाती आणि 1 लाख 38 हजार 168 जमाती. कर्जत 31 हजार 310 जाती आणि 3 हजार 284 जमाती. जामखेड 16 हजार 66 जाती आणि 1 हजार 92 जमाती, तर श्रीगोंदा 36 हजार 303 जाती आणि 13 हजार 293 जमाती अशी लोकसंख्या दाखवण्यात आली आहे.

ओबीसींची संख्या 8 लाखच !
पुढील पाच वर्षाच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आकडेवारीत जिल्ह्यात 8 लाख 27 हजार 150 ओबीसींची लोकसंख्या असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेतही आकडेवारी 22.64 टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. आता जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातीची लोकसंख्या 8 लाख असल्याचे सांगण्यात आले असून ही लोकसंख्या ओबीसींच्या लोकसंख्ये एवढीच असल्याने जिल्ह्यात उर्वरित सर्वजण खुल्या प्रवर्गात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...