सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस
दिल्ली | Delhi
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात अनेक घडामोडी घडत आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारने केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. अखेर केंद्र सरकारने शिफारस मान्य केली आहे.
बिहार सरकारने सोमवारी या प्रकरणाची सीबीआय चौकशीसाठी शिफारस पाठविली होती. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, त्या दरम्यान एसजी तुषार मेहता केंद्राच्या वतीने उपस्थित होते. तुषार मेहता न्यायालयात बोलताना म्हणाले, “बिहार सरकारने केलेली सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राने मान्य केली असून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे.”
तसेच यावेळी कोर्टाने महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना ३ दिवसात आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहे. याशिवाय कोर्टाने महाराष्ट्र सरकारला याप्रकरणाच्या तपासाचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत.