Sunday, November 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल कधी वाजणार? समोर आली...

Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल कधी वाजणार? समोर आली ‘ही’ तारीख

आचारसंहिताही लागू होणार

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) जम्मू-काश्मीर आणि हरियाणा (Jammu-Kashmir and Haryana) राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. त्याचवेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होतील, अशी आशा होती. पंरतु, निवडणुका काही जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार? याकडे राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. अशातच आता यांसदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, “कितीही बेताल…”

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा (Assembly Elections) निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग १० ऑक्टोबरला दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची देखील घोषणा होऊ शकते. निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून या दोन्ही राज्यांत आचारसंहिता (Code of Conduct) लागू होईल, असे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

दुसरीकडे राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्ष (Political Party) तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी (Mahayuti and Mahavikas Aaghadi) यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. तर मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील सरकारचा निर्णयांचा धडाका पाहता आगामी १० ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नेमकी कधी होते, याकडे,संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

हे देखील वाचा :  पुण्यात कोसळलेल्या ‘त्या’ हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे करणार होते प्रवास

दरम्यान, मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने २८ आणि २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचा (Maharashtra) दौरा केला होता. या दौऱ्यात १४ सदस्य असलेल्या या आयोगाच्या पथकामार्फत राज्यातील राजकीय पक्षांची परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि इतर बाबींसंदर्भात आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीनंतर आठ ते दहा दिवसात निवडणुकीची घोषणा केली जाते. तसे संकेत देखील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या झालेल्या पत्रकार परिषदेत मिळत होते. मात्र, निवडणुका कधी होतील याचे उत्तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी देणे टाळले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या