नवी दिल्ली | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून (Home Ministry) १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर,आरजू काजमी आणि सय्यद मजम्मिल शाह यांच्या चॅनेल्सचाही समावेश आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यामागे पाकिस्तानातील (Pakistan) दहशतवादी संघटनांचा हात असून, केंद्र सरकारकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
On the recommendations of the Ministry of Home Affairs, the Government of India has banned the 16 Pakistani YouTube channels including Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and… pic.twitter.com/AusR1fCkvN
— ANI (@ANI) April 28, 2025
या चॅनेल्सवर जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत, भारताचे सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि संवेदनशील माहिती खोटी व दिशाभूल करणार्या स्वरूपात पसरवल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News या चॅनेल्सचा समावेश आहे.
दरम्यान, यूट्यूबवर (Youtube) हे चॅनेल्स सर्च केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा आणि वा सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित केंद्र सरकारच्या आदेशानुसार हे चॅनेल्स सद्यस्थितीत या देशात उपलब्ध नाही. सरकारच्या बंदीशी संबंधित अधिक माहितीसाठी गुगल पारदर्शक रिपोर्टवर जा असा मेसेज दाखवत आहे.