Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्या५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रात

५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रात

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

महाराष्ट्रासह काही राज्यातील करोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या करोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे. केंद्र सरकारकडून तीन राज्यात तज्ज्ञांची 50 पथकं तैनात करण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. तर मृत्यूचीही संख्याही मोठी आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य सचिन राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील करोना परिस्थितीची माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव भूषण म्हणाले, देशात सर्वाधिक करोना रुग्णसंख्या असलेल्या पहिला दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. एक जिल्हा कर्नाटकातील आहे. तर छत्तीसगढ आणि दिल्लीतीलही एका जिल्ह्याचा टॉप टेनमध्ये समावेश आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

पंजाब आणि छत्तीसगढमध्ये वाढती मृत्यूसंख्या चिंतेची बाब आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के उपचाराधीन रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर मृत्यूचें प्रमाण 34 टक्के आहे. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचण्या घटल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला आरटी-पीसीआर चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. सध्या फक्त 60 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या महाराष्ट्रात होत असून, त्या 70 टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचें राज्य सरकारला सांगण्यात आलें आहे, असें भूषण यांनी सांगितलें.

महाराष्ट्रासह तीन राज्यात 50 पथकें

देशातील वाढत्या रुग्णसंख्येनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल रोजी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी कोविड प्रभावित राज्यांमध्ये तज्ज्ञांची केंद्रीय पथके पाठवण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे केंद्राने 50 पथकं तयार करून ती महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाबमध्ये पाठवण्यात आलेली आहेत.

राज्यात 297 रुग्णांचा मृत्यू

राज्यातल्या कालच्या आकडेवारीनुसार तब्बल 297 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद दिवसभरात झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 56 हजार 330 एवढा झाला आहे. त्यासोबतच आज दिवसभरात 55 हजार 469 नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा 31 लाख 13 हजार 354 वर गेला आहे. यापैकी 4 लाख 72 हजार 283 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्ह्यात 4 हजार 638 नवे रुग्ण

शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या आकडेवारीचा स्फोट असून काल 4 हजार 638 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 3 हजार 191 रुग्णांनी करोनावर मात केली. नाशिक जिल्हा राज्यात करोनाचा हॉटस्पॉट झाला असून रोज तीन ते चार हजार पॉझिटिव्ह रुग्णांचि भर पडत आहे.

शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावूनही करोना रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने यंत्रणेपुढील धोका वाढला आहे. नाशिक शहरात 19 हजार 256 हजार रुग्ण करोना पॉझिटिव्ह उपचार घेत आहे. तर मालेगाव हद्दीत 2 हजार 134 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 11 हजार 510 स्वॅब टेस्टिंग करण्यात आली

- Advertisment -

ताज्या बातम्या