Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! केंद्र सरकारचा पूजा खेडकरला दणका; प्रशासकीय सेवेतून केले बडतर्फ

मोठी बातमी! केंद्र सरकारचा पूजा खेडकरला दणका; प्रशासकीय सेवेतून केले बडतर्फ

नवी दिल्ली | New Delhi

वादग्रस्त आयएएस अधिकारी (IAS officer) पूजा खेडकर (Pooja Khedkar) बाबत केंद्र सरकारने (Central Government) मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून (Administrative Service) बडतर्फ केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं”; भाजपच्या वाटेवरील ‘या’ बड्या नेत्याचं गणरायाला साकडं

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, १९५४ च्या नियम १२ अंतर्गत पूजा खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तत्काळ कार्यमुक्त केले आहे. यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्यावर सरकारने ही कारवाई केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अलिशान साेसायटीत कुंटणखाना; पीसीबी-एमओबीचा छापा, महिलेसह दलाल अटकेत

दरम्यान, याआधी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ३१ जुलै रोजी त्यांची उमेदवारी (Candidacy) रद्द केली होती. तसेच त्यांना भविष्यातही परीक्षा (Exam) देता येणार नाही, असेही म्हटले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय सेवेतून बडतर्फ (Dismissed) केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या