Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेच्या 'या' बंडखोर आमदारांना केंद्राकडून CRPF ची सुरक्षा

शिवसेनेच्या ‘या’ बंडखोर आमदारांना केंद्राकडून CRPF ची सुरक्षा

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

काल शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

‘या’ आमदारांना केंद्राकडून सीआरपीएफची (Central Reserve Police Force) सुरक्षा

रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनवणे, प्रकाश सुर्वे, सदानंद सरनावणकर, योगेश दादा कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जैस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी कल्याणार, संदिपान भूमरे यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या