Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ; गोपनीय रिपोर्टमध्ये...

Devendra Fadnavis : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ; गोपनीय रिपोर्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका

मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतली. गोपनीय रिपोर्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचे बोलले जात आहे.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. पण, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अतिरिक्त फोर्स वनमधील १० ते १२ कमांडो तैनात केले आहेत. फोर्स वनमधील कमांडो हे फडणवीसांच्या घराबाहेर तैनात केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील घराबाहेर हे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांना आधीच झेड प्लस सुरक्षा आहे. गुप्तहेर संस्थांना गेल्या काही दिवसात मिळालेल्या सूचनांचे आधारे त्यांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ करण्यात आलीये. त्या अंतर्गत फोर्स वनचे कमांडो त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले.

फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ का?
एसआयडीच्या गोपनीय रिपोर्टमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा अलर्टवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याने ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या