Sunday, May 26, 2024
Homeदेश विदेशईडी संचालकांसाठी केंद्र सरकारची सुप्रिम कोर्टात धाव

ईडी संचालकांसाठी केंद्र सरकारची सुप्रिम कोर्टात धाव

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

केंद्र सरकारने पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा (ED Director SanjayKumar Mishra) यांचा कार्यकाळ वाढवावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. ३१ जुलै रोजी कार्यकाळ संपत असलेल्या संजय मिश्रा यांच्या प्रकरणावर २७ जुलै रोजी सुनावणी होणार असून, त्यानंतर या प्रकरणावरील पडदा उठणार आहे.

- Advertisement -

सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांनी ३१ जुलैपर्यंत पदमुक्त व्हावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्देशाचे पालन करणे अनिवार्य असतानाच आता पुन्हा संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा या यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या दरम्यान, केंद्र सरकारने नवीन ईडी संचालकांची निवड करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच त्यांचा कार्यकाळ वाढवणे हे बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. आता यावर सुप्रीम कोर्ट २७ जुलैला आपला निर्णय देणार आहे. सुप्रीम कोर्ट उद्या काय निर्णय देते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

PM Modi No Confidence Motion : मोठी बातमी! मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यास लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

दरम्यान, संजय मिश्रा हे ईडीचे संचालक म्हणून १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये नियुक्त झाले होते. त्यांचा कार्यकाळ हा २०२० मध्ये समाप्त होणार होता. मात्र, केंद्र सरकारने त्यांना एक वर्षाची सेवा मुदत वाढ दिली. स्वयंसेवी संस्था ‘कॉमन कॉज’ने सुप्रीम कोर्टात या मुदतवाढीला आव्हान दिले होते. ८ सप्टेंबर २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले की, त्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) अधिनियम अंतर्गत एक सुधारणा अध्यादेश जारी केला. त्यानुसार, संजय मिश्रा यांचा कार्यकाळ १८ नोव्हेंबर २०२३ रोजी संपणार होता. आता, त्याआधीच सुप्रीम कोर्टाने ही सुधारणा रद्द केली आहे.

“मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत…”; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची चंद्रशेखर बावनकुळेंनी उडवली खिल्ली

संजय मिश्रांची कारकिर्द

संजय मिश्रा हे १९८४ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (IRS) आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये, संजय मिश्रा यांना ईडीचे संचालक बनवण्यापूर्वी त्यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम संचालक बनवण्यात आले होते. मिश्रा यांना आर्थिक तज्ञ देखील म्हटले जाते आणि त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांची ईडी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ईडीचे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रा यांची दिल्लीतील आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या