Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी धाडसी निर्णय घ्यावेत- पवार

केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी धाडसी निर्णय घ्यावेत- पवार

ओझे । वार्ताहर Oze

- Advertisement -

जगात आपल्या देशाची प्रतिष्ठा आपल्या पंतप्रधानांनी वाढवली असे सांगितले जाते त्याचा आम्हाला अभिमान आहे परंतु बांगलादेश सारखा देश आमचे द्राक्ष घेणार नसला तर ती प्रतिष्ठा काय कामाची असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारने ( Central Govt )शेतकरी हितासाठी धाडसी निर्णय घ्याव, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar)यांनी केले. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ( Kadava Co Op Sugar Factory)असावणी ( डिस्टिलरी) इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ (Inauguration of ethanol project )शरद पवार यांचे हस्ते झाला .त्यावेळी पवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे नितीन पवार, आ. दिलीप बनकर, आ.नरेंद्र दराडे , माजी खा. देवीदास पिंगळे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे , गणपतराव पाटील, दत्तात्रय पाटील , सदाशिव शेळके , संजय पडोळ , कादवा चेअरमन श्रीराम शेटे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार यांनी साखर उद्योग नेहमीच अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याने साखरेला उठाव नाही. अशा स्थितीत कारखाने मोठ्या अडचणीत आलेले आहेत. जगात केवळ साखर निर्मिती नाही तर इथेनॉल बनवले जात आहे ते आपणही करावे यासाठी आपण प्रयत्न केले. त्यास केंद्र सरकारनेही मान्यता देत चालना दिली व श्रीराम शेटे यांनी वेळीच इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. कमी वेळेत हा प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पामुळे पुढील काही वर्षात शेतकर्‍यांना निश्चित किमान शंभर रुपये तरी जादा भाव मिळणार आहे.

शेटे यांचे कारखाना चालवण्याचे कसब कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात गाजावा असा एकमेव कारखाना आहे . या कारखान्यात चेअरमन व संचालक यांच्यासाठी गाडी नाही त्यावरूनच येथील कामकाज लक्षात येते .तसेच कोणतीही उपपदार्थ निर्मिती नसताना कारखाना सुस्थितीत ठेवत त्याचे विस्तारीकरण करत शेतकर्‍यांना चांगला भाव दिला आहे. आज सहकार क्षेत्र टिकवायचे असेल तर श्रीराम शेटे यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे, असे म्हणत पवार यांनी सध्या उसापासून हायड्रोजन निर्मितीचे प्रकल्प सुरू झाल्याचे ऐकत आहे त्याची आम्ही सविस्तर माहिती घेत आहोत जर हा प्रकल्प यशस्वी होत असला तर तो आपल्या देशातही राबविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे पवार यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्रीराम शेटे यांच्या कामकाजाचे कौतुक करत यांचा आदर्श इतर सहकारी संस्था चालवणार्‍यांनी घ्यावा असे सांगितले .यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीजिल्हा बँक कर्जाबाबत शेतकरी अडचणीत आले असून त्यांचेसाठी राष्ट्रीयकृत बँक प्रमाणे ओटीएस योजना राबविण्यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले.

प्रास्ताविक करताना चेअरमन श्रीराम शेटे यांनी करताना म्हटले की, विस्तारीकरण करण्यास परवानगी मिळाली नाही पण शरद पवार यांनी आपल्याला आधुनिकीकरण करण्याचा सल्ला दिला त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण कामकाज केल्याने व संचालक मंडळ सभासद यांच्या सहकार्याने कादवा यशस्वी वाटचाल करत असून इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याचे स्थैर्य व ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी श्रीराम शेटे यांचे अमृतमहोत्सवी वाढदिवस निमित्त लोकनेता गौरव विशेषांकाचे प्रकाशन पवार यांचे हस्ते झाले. आभार संचालक सुकदेव जाधव यांनी मानले यावेळी सर्व संचालक, शेतकरी अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांबेंना पुढे घ्या

कादवाचा इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे काहीसे मागे उभे होते. त्यांना बघत पवार यांनी तांबे यांना पुढे घ्या असे म्हटले त्यावर आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतले साहेब त्यांना पुढे म्हटले तर इतरांनी साहेब त्यांना खूप बहुमताने आपण पुढे घेतले असे सांगत जणू राष्ट्रवादी त्यांचे सोबत होती असे संकेत दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या