दिल्ली । वृत्तसंस्था Delhi
केंद्रातील मंत्रिमंडळाने जातीय जनगणनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी सातत्याने गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून होत होती.
आज झालेल्या कॅबिनेटमधील काही वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकीमध्ये जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. येणार्या जनगणवेळी जातींची मोजणीही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जनगणनेसोबत जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा सरकारने उचललेलं ऐतिहासिक पाऊल असल्याचेही म्हटले जात आहे.
त्याचं कारणं म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात जनगणनेमध्ये जातींचा समावेश आतापर्यंत कधीही करण्यात आलेला नव्हता. स्वातंत्र्यपूर्व काळात जातिनिहाय जनगणना झाल्याची नोंद आहे. त्यानंतर आता पहिल्यांदाच अशा स्वरूपाची जनगणना होणार आहे.