Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा निर्याती बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

कांदा निर्याती बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

शेतकरी,निर्यातदारांना मिळणार दिलासा

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

केंद्र सरकारने कांद्यावरी किमान निर्यात मूल्याची अट (MEP) हटवण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून शेतकरी आणि निर्यातदार व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

मे 2024 मध्ये, मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती, परंतु किमान निर्यात मूल्य 550डॉलर प्रति मेट्रिक टन निश्चित केली होती. आता प्रमुख देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव स्थिर झाले आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्रात तसेच जेथे प्रामुख्याने कांदा पीक घेतले जाते,अशा राज्यामध्ये शेतकरी किमान निर्यात मूल्य हटवण्याची मागणी करत होते. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.550 डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्याची अट रद्द करण्याची अधिसूचना वाणिज्य मंत्रालयातील विदेश आणि व्यापार विभागाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी काढला आहे.

550 डॉलर प्रति टन निर्यात मूल्य आणि 40 टक्के निर्यात शुल्क यामुळे जूनमध्ये भारतातील कांद्याच्या निर्यातीत 50 टक्क्यांहून अधिक घट झाली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या