Thursday, October 31, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या पाच पोलीस अधिकाऱ्यांना 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' जाहीर

नाशिकच्या पाच पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरातील दहशतवाद विरोधी कारवाई व गुन्हे तपासात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या सुरक्षा विभागासह पाेलीस, सीआरपीएफ, सीबीआय,आयबी, आयटीबीपीएफ, एनसीबी, एनआयएतील ‘पाेलीस महानिरीक्षक’ (आयजी) ते अंमलदारांपर्यंत अधिकारी व अंमलदारांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. पदक गुरुवारी (दि. ३१) जाहीर करण्यात आले.

दहशतवादविरोधी विशेष कृतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्हा पाेलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांना तर, उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण केल्याने नाशिक शहर गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, तसेच पंचवटी विभागाचे सहायक आयुक्त नितीन जाधव व पाेलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांना हे पदक जाहीर झाले असून येवल्याचे सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांनाही हा बहुमान मिळाला आहे.महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या