नाशिक रोड | प्रतिनिधी
देवळाली कॅम्प ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे, तर दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाल्याचे पहायला मिळाले.
याबाबतचे वृत्त असे की देवळाली ते नाशिक रोड विभागातील डाऊन लाईनवर दि. २० जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE)तारेत बिघाड झाल्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले असून, काही गाड्यांची सेवा प्रभावित झाली आहे.
वळविण्यात आलेल्या गाड्या –खालील मार्गांवरुन वळवण्यात आले: (कल्याण, वसई रोड, सूरत, जळगाव मार्गांमार्फत)
-22177 मुंबई –वाराणसी एक्सप्रेस
-22538 लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर एक्सप्रेस
-20103 लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर एक्सप्रेस
-12859 मुंबई–हावडा गीतांजली एक्सप्रेस
-22129 लोकमान्य टिळक टर्मिनस–अयोध्या कॅण्ट एक्सप्रेस
-04152 लोकमान्य टिळक टर्मिनस–कानपूर विशेष
-12336 लोकमान्य टिळक टर्मिनस–भागलपूर एक्सप्रेस
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
11113 देवळाली ते भुसावळ एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
-11119 इगतपुरी ते भुसावळ मेमू रद्द करण्यात आली आहे.
वेळेत बदल
-15017 लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर काशी एक्सप्रेस 03.50 तास उशीरा सुटणार लोकमान्य टिळक टर्मिनस येथून
-12534 मुंबई लखनौ पुष्पक एक्सप्रेस 01 तास उशीरा सुटणार मुंबई येथून
-12519 लोकमान्य टिळक टर्मिनस–अगरतला एक्सप्रेस 03.20 तास उशीरा सुटणार लोकमान्य टिळक टर्मिनस येथून
-17617 मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस 02 तास उशीरा सुटणार मुंबई येथून
उशिराने धावणाऱ्या गाड्या
-12322 मुंबई हावडा मेल 09 तास उशीरा
-18029 लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस 08 तास उशीरा
-12167 लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस एक्सप्रेस 10 तास उशीरा
-12141 लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस 10 तास उशीरा
-11057 मुंबई अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस 10 तास उशीरा
-12811 लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया एक्सप्रेस 08 तास उशीरा
प्रवाशांसाठी सुविधा
-“मे आय हेल्प यू” बूथ सर्व प्रमुख स्थानकांवर सुरु करण्यात आले असून प्रवाशांना मार्गदर्शनासाठी रेल्वे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
-तिकीट परताव्यासाठी विशेष काउंटर स्थानकांवर उघडण्यात आले आहेत.
-वळविलेल्या गाड्यांची घोषणाबाजी सर्व संबंधित स्थानकांवर सातत्याने करण्यात येत आहे जेणेकरून प्रवाशांना योग्य माहिती मिळू शकेल.
-यादरम्यान अनारक्षित डब्यातील प्रवाशांना चहा, पाण्याच्या बाटल्या आणि नाश्ता वितरित करण्यात आला.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक पथक युद्धपातळीवर कार्यरत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




