नाशिकरोड। प्रतिनिधी Nashikroad
होळी सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई एलटीटी-गोरखपूर दरम्यान होळी विशेष ट्रेन चालविणार आहे.
एलटीटी मुंबई-गोरखपूर होळी विशेष ट्रेन क्रमांक 05326 ही मुंबई येथून 13 ते 24 मार्चदरम्यान गुरूवार आणि सोमवारी सकाळी 10.20 वाजता सुटेल. गोरखपूर येथे दुसर्या दिवशी रात्री आठला पोहोचेल.
गोरखपूर-मुंबई होळी विशेष गाडी क्रमांक 05325 गोरखपूर येथून मंगळवार आणि शनिवारी 11 ते 22 मार्चपर्यंत 19.00 वाजता सुटेल आणि मुंबई एलटीटी येथे तिसर्या दिवशी सकाळी 6.50 वाजता पोहोचेल.
या गाड्यांना ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, रानी कमलापति-भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई-झांसी, उरई, गोविन्दपुरी, प्रयागराज, अयोध्या, मनकापूर आणि खलीलाबाद येथे थांबे राहील. 4 वातानुकूलित तीन डबे, शयनयानचे चार डबे, जनरल सेकंड क्लासचे चार डबे या गाडीला राहतील.