Saturday, May 4, 2024
Homeजळगावजि. प. मुख्याधिकार्‍यांची किन्ही प्राथमिक शाळेला भेट

जि. प. मुख्याधिकार्‍यांची किन्ही प्राथमिक शाळेला भेट

खंडाळा, (Khandala) ता. भुसावळ (वार्ताहर)

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी पंकज आशिया (सीईओ) (Zilla Parishad Chief Officer Pankaj Asia (CEO) यांनी जिल्हा परिषदेच्या किन्ही प्राथमिक शाळेला (kinhi primary school) भेट देऊन बाला उपक्रमांतर्गत भेट दिली. असता शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता डोळे यांनी बाला उपक्रमाची (Bala project) लोकसहभागातून केलेल्या कामाची माहिती दिली.

- Advertisement -

अँफि थियेटर, सूर्यमाला, लपंडाव भिंत, आभासी वर्गखोली, सापशिडी, पटाचे खेळ, शाळेच्या इमारतीवर प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी व शाळेचा परिसर विद्यार्थ्यांसाठी आनंदमय व अभ्यासाची गोडी वाढवणारा होईल यादृष्टीने सुंदर अशी निर्मिती शाळेत अभ्यासास पूरक केलेली आहे. तसेच शिक्षक ओंकार पाटील व सपकाळे सर यांनी सुद्धा विविध गणिती खेळ व विविध मुद्द्यांची अभ्यास पूर्ण माहिती यावेळी सांगितली.

या उपक्रमांंतर्गत ४३ मुद्यांपैकी ४० मुद्दे शाळेने पूर्ण केले असून बाकीचे ३ मुद्दे दोन दिवसात पूर्ण करणार आहोत. असे मुख्याध्यापक सुनीता डोळे यांनी सांगितले. सिईओ पंकज आशिया यांनी यावेळी हा बाला उपक्रम बघून सर्वांचे खूप मनापासून कौतुक करून समाधान व्यक्त केले.

यावेळी गटविकास अधिकारी विलास भाटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटणकर, गट शिक्षणाधिकारी श्री. वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, केंद्रप्रमुख चौधरी, खाटीक सर उपस्थित होते. सर्व अधिकारी वर्ग यांच्या मार्गदर्शनामुळे हे सारे शक्य झाले असे मुख्याध्यापिका सुनीता डोळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या