Tuesday, December 10, 2024
Homeनगरचांदेकसारे परिसरात मुरघासाच्या मकाला मोठी मागणी

चांदेकसारे परिसरात मुरघासाच्या मकाला मोठी मागणी

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसर दुग्ध व्यवसाय अग्रेसर असल्याने जनावरांना वर्षभर पुरेल इतका चारा दूध उत्पादक शेतकरी मुरघासाच्या बॅगा भरून ठेवतात. सध्या परिसरात चिकारलेल्या मका पिकाला मागणी वाढली असून भावही तेजीत चालू आहे.

- Advertisement -

चांदेकसारे परिसरात दूध उत्पादकांचे गायी म्हशीचे मोठमोठे गोठे आहेत. पोहेगांव सोनेवाडी परिसरातही दुग्ध व्यवसाय करणारे दूध उत्पादकांची संख्या जास्त आहे. दररोज गोठ्यातील गाईंना चारा आणण्यासाठी दूध उत्पादकांना मोठे कष्ट सोसावे लागत होते मात्र गेल्या पाच वर्षापासून या परिसरात मुरघासाची प्रक्रिया यशस्वी झाली असून परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मका, ज्वारी, ऊस आदी पिकांचा मोरघास करण्यावर जास्त भर देतात मुरघास केलेला चारा जनावरांना दिल्यास दुधाचे प्रमाणही वाढण्यास मदत होते. चार पाच महिने पुरवणीचा चारा म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. शक्यतो मका पिकाच्या मुरघासा वरच दूध उत्पादक लक्ष केंद्रित करतात त्यामुळे परिसरातील मका उत्पादक शेतकर्‍यांना मके साठी मागणी वाढली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या