Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमसावेडीत महिलेचे दागिने चोरणारा श्रीरामपूरचा चोरटा अटकेत

सावेडीत महिलेचे दागिने चोरणारा श्रीरामपूरचा चोरटा अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी || 50 हजारांचे दागिने जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील सावेडी उपनगरात महिलेचे दागिने चोरणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. बलराम ऊर्फ बल्ली रामचिंत यादव (वय 25 रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नंबर सात, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

- Advertisement -

अलका रमेश कांबळे (वय 69, रा. किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहर रस्ता, सावेडी) या 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गुलमोहर रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने अलका यांच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून चोरून नेली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ, विशाल तनपुरे, रमिजराजा आत्तार व मेघराज कोल्हे यांचे पथक चोरी करणार्‍या संशयित आरोपीचा शोध घेत होते.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा बल्ली यादव याने केला असून तो ढवणवस्ती, माऊलीनगर, अहिल्यानगर येथे आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यावरून त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासकामी त्याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दागिन्यांची विक्री लोणीच्या ज्वेलर्समध्ये
नमूद गुन्ह्यांच्या अनुषंगाने बल्ली यादव याच्याकडे पोलिसांनी विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्याकडील दुचाकीवर येऊन केला असल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने लोणी (ता. राहाता) येथील अक्षय ज्वेलर्सच्या मिरा बनसोड यांना विकल्याची माहिती दिली. पथकाने पंचासमक्ष अक्षय ज्वेलर्स, लोणी येथून 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची लगड तपासकामी जप्त केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...