अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाशिवरात्री व त्यापूर्वी शहरात चैन स्नॅचिंग करणार्या सराईत गुन्हेगाराच्या कोवताली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दुचाकी व चोरीचे सोने असा दोन लाख 24 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. अभिमन्यु विलास कुसळकर (वय 23 वर्षे, रा. सोनई, ता. नेवासा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांना माहिती मिळाली की, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत महाशिवरात्रीच्या दिवशी चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी दुचाकीवरून शहरात पुन्हा गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेत कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
कुसळकर असे नाव सांगितले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने साथीदार अजय रुस्तम शिंदे (रा. कोठला, नगर) याच्यासह 20 मे 2024 रोजी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून एक दुचाकी व गुन्ह्यातील चोरीचे दागिने असा दोन लाख 24 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलिस अंमलदार रोहिणी दरंदले, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, विशाल दळवी, संदीप पितळे, हवालदार दीपक रोहोकले, तानाजी पवार, सूरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, संकेत धिवर, राम हंडाळ व मोबाईल सेलचे राहुल गुंडु, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.