Tuesday, March 25, 2025
Homeक्राईममहिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याची पोत ओरबडली

महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याची पोत ओरबडली

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी बस स्थानकात (Rahuri Bus Stand) एक महिला बसमध्ये चढत असताना दोन भामट्या महिलांना हाथ धरले. तर एका भामट्याने गळ्याला चाकू लावून महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत (Chain Snatching) काढून घेतल्याची घटना घडली आहे. हिराबाई म्हसु कल्हापुरे (वय 60 रा. उंबरगाव, ता. श्रीरामपुर) या दि. 9 ऑगस्ट 2024 रोजी नांदगाव शिंगवे (Nandgav Shingave) येथे कामानिमित्त गेल्या होत्या. दुपारच्या दरम्यान त्या श्रीरामपुरकडे (Shrirampur) परत जाण्यासाठी राहुरी बस स्थानक येथे थांबल्या असता काही वेळात अहमदनगर- श्रीरामपुर बस आली.

- Advertisement -

तेव्हा हिराबाई कल्हापुरे या बसमध्ये चढत असताना अज्ञात दोन महिलांनी त्यांचे हाथ धरले तर एका भामट्या पुरुषाने हिराबाई कल्हापुरे यांच्या गळ्याला चाकू लावून एक तोळा वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर सदर भामटा व महिला तेथुन पसार झाल्या. हिराबाई कल्हापुरे यांनी आरडाओरड केली. परंतू भामटे तो पर्यंत पसार झाल होते. घटनेनंतर हिराबाई म्हसु कल्हापुरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 905/2024 भारतीय न्याय संहिता कलम 112 (2), 307, 309 (2), 309 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...