Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : वॉकिंगवरून परतताना वृध्देच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

Crime News : वॉकिंगवरून परतताना वृध्देच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरात कविजंग नगर परिसरात पहाटेच्या सुमारास वॉकिंगहून परतणार्‍या एका 60 वर्षीय वृध्द महिलेला धक्का देत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिताबाई दिनेशकुमार मंडल (वय 60, रा. कविजंग नगर, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, सिताबाई नेहमीप्रमाणे बुधवारी (6 ऑगस्ट) पहाटे 5.30 वाजता वॉकिंगसाठी गेल्या होत्या. मारूती मंदिर, नवलेनगर येथे देवदर्शन करून परत येत असताना, 5.45 वाजेच्या सुमारास मंदिराबाहेर काही अंतरावर गेल्यावर एका अनोळखी इसमाने त्यांच्या मागून येत अचानकपणे गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. सिताबाई यांनी आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग केला. परंतु संबंधित इसमाने काही अंतरावर आधीच लावून ठेवलेली दुचाकी चालू करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्याच्या दिशेने पलायन केले.

YouTube video player

सिताबाई यांनी घटनेची माहिती आपल्या कुटुंबाला दिली. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून अधिक तपास सुरू आहे.

पहाटेच्यावेळी पोलीस गायब, चोरटे सक्रिय
सावेडी उपनगरात नेहमीच सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहे. मागील 15 दिवसांपूर्वी गुलमोहर परिसरात एका महिलेचे दागिने ओरबडून नेले होते. ही घटना देखील सकाळच्या सुमारास घडली होती. रात्रीच्यावेळी गस्त घालून पोलीस पहाटे गस्तीवरून निघून जातात. त्यानंतर चोरटे पहाटे व सकाळी सकाळी सक्रिय होऊन वॉकिंग किंवा देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेत असल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...