Monday, November 25, 2024
Homeधुळेचाळीसगावच्या दुचाकीस्वाराची अडवणूक ; धुळे येथील पोलीस एसीबीच्या जाळ्यात

चाळीसगावच्या दुचाकीस्वाराची अडवणूक ; धुळे येथील पोलीस एसीबीच्या जाळ्यात

धुळे – प्रतिनिधी dhule

डायव्हिंग लायन्सस (Diving Lions) असतांना देखील तहसिल चौक परिसरात विनाकारण अडवुन करून या-ना त्या कारणांने २०० ते ५०० रुपयांची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला (police) चाळीसगाव (chalisgaon) येथील दुचाकी स्वाराने चांगलीच अद्दल घडविली. दुचाकीस्वाराच्या तक्रारीनुसार धुळे एसीबीच्या (acb) पथकाने वाहतूक पोलिसाला दोनशे रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले.

- Advertisement -

या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे उमेश दिनकर सुर्यवंशी असे शहर वाहतुक शाखेच्या लाचखोर पोलीस हेडकॉन्टेबलचे नाव आहे. चाळीसंगांव येथे राहणारे तक्रारदार हे त्यांचे दुचाकीने धुळे येथे नेहमी येणे जाणे असते. धुळे शहरात प्रवास करतांना त्यांना तहसिल चौकात तसेच अॅग्लो उर्दु हायस्कुल जवळ ड्युटीस असलेले ट्राफिक पोलीस त्यांना विनाकारण अडवुन त्यांचेकडे ड्रायव्हिंग लायन्सस असतांना देखील या-ना त्या कारणांने त्यांच्या कडे २०० ते ५०० रूपयाची मागणी करून त्यांच्या मागणी प्रमाणे पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस त्यांना जावु देत नाही.

यांनी केली कारवाई :- ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर संतोष पावरा, गायत्री पाटील, भुषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहीणी पवार प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे यांनी केली आहे.

त्यांचे वाहनांवर मोठ्या रक्कमेचा ऑनलाईन दंड आकारण्याचे सांगत असत. तक्रारदार यांना तेथे डयुटीस असलेल्या टाफिक पोलीसांचा नेहमीचा व पैसे वसुलीचा त्रास होत असल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार आज एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणी दरम्यान धुळे शहरात जुना आग्रा रोड लगत अॅग्लो उर्दु हायस्कुल समोरील रस्त्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांना थांबवुन त्यांच्याकडे वाहनांवर ऑनलाईन दंड नको असेल तर २०० रूपये लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्वत:साठी स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या विरूध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या