Sunday, October 13, 2024
Homeराजकीयशेतकरी विरोधी कायदा मागे घेण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

चाळीसगाव – chalisgaon – प्रतिनिधी :

शेतकरी विरोधी कायदेमागे घेऊन शेतकर्‍यांना न्याय मिळावा, यासाठी चाळीसगाव तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावर धरणे देऊन केंद्र सरकारचा निषेध केला.

- Advertisement -

याप्रसंगी विविध मागणीचे नवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने संसदेत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता शेतकरी विरोधी तीन कायदे संसदेत मंजूर करुन घेतले.

या नवीन आणलेल्या काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उध्दवस्त होणार आहे. या कायद्यामुळे लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यावर येतील.

या विरोधात शेतकरी विरोध करत असतांना केंद्रातील हे निर्दयी व हुकुमशाही सरकार त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीचार्ज करीत आहेत. या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संसदेत कोणत्याही प्रकारची चर्चा व संवाद न साधताच गरीबांवर व शेतर्‍यांवर अन्याय करणारा असा कायदा लादत आहेत.

या कायद्यामुळे शेती ही भांडवलदारांच्या ताब्यात जाणार असून शेतीवर आधारीत छोटे-छोटे उद्योग व्यवसाय बंद पडणार आहेत. शेतमजूर देशोधडीला लागतील. जैविक शेतीचा र्हास होवून रासायनिक शेती प्रक्रिया वाढुन शेतीची हानीच होणार आहे.

शेतकरी, शेतमजूर, कृषी बाजार समितीतील दुकानदार, बाजार समितीमधील कामगार, कष्टकरी या सर्वांना नष्ट करण्याचे काम भाजप शासन करीत आहे. असे कॉंग्रेसतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या आंदोलनात तालुका अध्यक्ष अनिल निकम व शहराध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील यांच्यासह प्रा.एम एम पाटील, ए.व्ही पाटील, धनंजय चव्हाण, ऍड.ऋतुजा वाघ, रमेश शिंपी, रवींद्र जाधव, मंगेश कुमार अग्रवाल, वाडीलाल चव्हाण, संदीप सोनार, भाईदास पाटील, हिरामण सैंदाणे, नरेंद्र पाटील, तमाल देशमुख, भगवान पाटील, वाल्मीक पाटील, गुलाब खाटीक, नितीन सूर्यवंशी, पंकज शिरोडे, बापूराव राणे, वाल्मीक निकम, दगडू धनके, गौतम निकम, रवींद्र पाटील, शब्बीर पिंजारी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या