Saturday, July 4, 2026
Homeमुख्य बातम्याChalisgaon Crime News : चाळीसगावात एका व्यापार्‍याला मारहाण; वड्याचे तेल वांग्यावर काढल्याचा...

Chalisgaon Crime News : चाळीसगावात एका व्यापार्‍याला मारहाण; वड्याचे तेल वांग्यावर काढल्याचा प्रकार

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon

येथे एका व्यापार्‍याला भाजपाच्या (BJP) काही नगरसेवक, नगरसेवकाचे पती व पदाधिकार्‍यांनी महिला छेडछाडीच्या आरोपावरुन धक्काबुक्की व मारहाण करत थेट पोलीस ठाण्यात (Police Station) नेल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी घडली. परंतु, महिलेच्या छेडछाडीचे जरी कारण पुढे केले जात असले, तरी हा ‘ व्यापारी ’ लोकप्रतिनिधीच्या विरोधात सोशल मीडियावर नेहमीच हक्क मागतोय चाळीसगावकर ‘गरळ’ ओकतो म्हणून त्याला अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार पद्धतशिरपणे ‘घडवून’ आणल्याची चर्चा संपूर्ण शहरात आहे.

- Advertisement -

दुपारी हे प्रकरण बर्‍याच वेळ पोलीस ठाण्याच्या आवारात रेंगाळत होते. हा व्यापारी देखील संबंधित मारहाण (Beaten) करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होता. तसेच संबंधित नरगसेवक देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करणार होते. त्याचवेळी भाजपा व शहर विकास आघाडीचे काही नगरसेवकांचा जमाव देखील या ठिकाणी जमला होता. दोन्ही एकेमकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु होती. परंतु, तितक्यात काही नेत्यांची फोनाफानी झाल्यानतंर प्रकरण तुर्तास शांत झाल्याचे बोलले जात आहे.

मात्र, एखाद्या व्यापार्‍याला कारण नसतांना फक्त बदला काढण्याच्या उद्देशाने मारहाण करत, पोलीस स्टेशनला आणले जात असेल तर चाळीसगाव पोलिसांची (Chalisgaon Police) तीन कार्यालय असून देखील शहरातील कायदा व सुव्यवस्था कुठे आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दरम्यान, आता पोलिसांनी खर्‍या कारणांचा शोध घेऊन संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चाळीसगाव पोलीस या प्रकरणात स्वत: काय ? भूमिका घेतात हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. या प्रकरणाला लोकसभा, विधानसभा, नगरपालिका निवडणुकांची देखील किनार असल्याची चर्चा संपूर्ण शहरात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Onion News : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारकडून खरेदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Farmer) दिलासादायक निर्णय घेत केंद्र सरकारने (Central Government) किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत महाराष्ट्रातील कांदा खरेदीचा दर...