Saturday, May 4, 2024
Homeजळगावचाळीसगाव : दहीवद येथे नाला खोलीकरणाचा शुभारंभ

चाळीसगाव : दहीवद येथे नाला खोलीकरणाचा शुभारंभ

चाळीसगाव – Chalisgaon – प्रतिनिधी :

शिवनेरी फाउंडेशन संचलित अभियान अंतर्गत भूजल अभियाना मध्ये चाळीसगाव तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली.

- Advertisement -

गेल्या तीन वर्षापासून भूजल अभियान तालुक्यात जल साक्षरता व जल संधारणाची कामे करत आहे. तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पर्धेत आर्थिक साहाय्य केले. आज गुणवंत दादा सोनवणे यांनी दहीवद येथे जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले ज्यातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

दहीवद गावातील शेतकर्‍यांनी आपल्या बांधावर पाणी अडवण्यासाठी नाला खोलीकरण करून घेत, स्वखर्चाने डिझेल टाकून पोकल्यान मशीन उपलब्ध झाल्याने कामांना सुरुवात केली आहे. खरेतर शास्त्र आणि शिस्त या दोन गोष्टींना अनुसरून आपले गाव पाणीदार करण्यासाठी दहीवद गाव पुढे आले आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितीतही तालुक्यातील ११ गावांमध्ये कामे होऊन ५३ कोटी लिटरचा जलसाठा निर्माण झाला आहे. यावर्षी ३५ गावांचे नियोजन पुर्ण झाले असुन ३५ गावांची माहिती संकलन गावांचा जल आराखडा ही तयार होणार आहे.

जल आराखडा तयार करून तांत्रिक दृष्ट्या जल संधारणाचे काम खूप मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचे उद्दीष्ट शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान चाळीसगाव हे अभियान साध्य करणार आहे. त्या अनुषंगाने मिळालेल्या जेसीबी मशिनच्या कामाचा नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ सोमवारी (दि,२३)दहीवदयेथे करण्यात आले.

या कामाचे उद्घाटन बळीराम भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच नवल पवार, अनिल देवरे, हिंमत पिरा, नितीन भोसले, राहुल वाघ, भूजल टीमचे तालुका समन्वयक राहुल राठोड आदी शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या