Saturday, May 18, 2024
Homeजळगावइतिहासात प्रथमच निवडणुक प्रचाराचा नारळ फुटला

इतिहासात प्रथमच निवडणुक प्रचाराचा नारळ फुटला

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटी ही सर्वात जुनी विविध कार्यकारी सोसायटी असून स्थापनेनंतर प्रथमच या (Society) सोसायटीच्या निवडणुका होत आहे. जेष्ठ नेते प्रदिपदादा देशमुख यांच्या सत्ताधारी गटात विरोधात (mla Mangesh Chavan) आ.मंगेश चव्हाण यांनी प्रथमच जणपरिवर्तन पॅनल उभे ठाकले आहे. एकूण १३ जागांसाठी होऊ घातलेली ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काल माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपाबाबत बरीच खलबते झाली. मात्र ही सर्व खलबते निष्फळ ठरल्यानंतर अखेर आज दुपारी आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित जनपरिवर्तन पॅनलचा प्रचार नारळ फोडण्याचा कार्यक्रम येथील रथ गल्लीतील आनंद माता मंदिरात संपन्न झाला.

- Advertisement -

चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या स्थापनेपासूनचा कारभार हा येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. स्थापनेनंतर या सोसायटीचा बिनविरोध इतिहास असताना, आता चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटीची प्रथमच होत असलेली ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काल माघारीच्या आणि आज प्रचार नारळ फोडण्या पर्यंतच्या कार्यक्रमापर्यंत एकूण १३ जागा पैकी ६ जागा आमदार मंगेश चव्हाण यांच्या गटाने मागितल्या होत्या. मात्र सत्ताधारी गटाने त्या देण्यास नकार दिल्याने अखेर आज दुपारी प्रचाराचा नारळ आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह समर्थकांनी शहरातील आनंद माता मंदिरात फोडला. आता सोसायटीच्या इतिहासात प्रथम होवू घातलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रथम मतदारांना चांगला भाव खाता येणार आहे.

चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदेवता आनंदामाता मंदिर या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला. शतकानंतर होणार्‍या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनपरिवर्तन पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी, मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी, सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी आणि ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले आहे.- आमदार मंगश चव्हाण

- Advertisment -

ताज्या बातम्या