Saturday, May 4, 2024
HomeजळगावVideo चाळीसगाव : कन्नड घाट वाहतुकीसाठी महिनाभर बंद ?

Video चाळीसगाव : कन्नड घाट वाहतुकीसाठी महिनाभर बंद ?

ऑन दी स्पॉट रिपोर्ट- मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

- Advertisement -

गौतळा डोंगर (Gautala mountain) परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कन्नड घाटातील (Kannada Ghat) रस्त्यावर ठिक-ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कालपासून दगड व मातीचा मलबा हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. घाटातील म्हसोंबा मंदिराजवळील पडलेला मोठा दगड बाजूला करण्याचे काम चालू आहे. मोेठ्या प्रमाणा पाण्याचा प्रवाह, दगड व मातीमुळे रस्त्यावरील कठडे ठिक-ठिकाणी तुटले आहेत. तसेच रोडाला देखील अनेक ठिकाणी तडे गेल्यामुळे घाटाच्या दुरुस्तीसाठी किमान महिनाभराचा कालवधी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

photo कन्नड घाटाच्या दुर्देशेचे हे १५ फोटो तुम्ही पहिले नसणार

चाळीसगाव (chalisgaon) शहरापासून अवघ्या वीस ते बाविस किमी अंतराच्या परीसरातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणार्‍या नद्यांच्या उगम क्षेत्रावर परवा रात्री ढगफुटी सदृष्य पाऊस पडल्याने त्याचा परीणाम चाळीसगांव शहरासह शहरापासून जळव असलेल्या कन्नड घाटातील रस्त्यावर झाला आहे. शहरात पाणी घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पुलाचे नुकसान झाले आहे. कन्नड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने घाटात गाळ व दगड वाहुन रस्त्यावर आला होता. यात अनेक वाहने फसली होती.

घाटात बंचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (NDRF team) (एसडीआरएफ टिम,धुळे) तैनात असून कला पासून त्यांनी चिखलात रुतलेली ३० ते ४० वाहने गाळातून चार ते पाच जेसीबीच्या साह्याने मोकली केली आहेत. तर १०० ते १५० पडलेली झाडे बाजूला केली आहेत. यासाठी एसडीआरएफचे पोलीस निरिक्षक कैलास पवार, पीएसआय शिवाजी सोनवणे यांच्यासह नारायण काटे, आनंद देवरे, सोनल चौधरी, योगेश्वर धनगर, कमलेश भामरे, प्रविण चौधरी, आबा कापुरे, मदन बाविस्कर, स्वप्नील पाटील, अनिल झिरे, अशोक पवार, किरण माळी, निलेश अहिरे, हिम्मत पाटील, अनिल वाघ, महेंद्र कोळी, हसंराज पाटील, सुनिल माळी, समाधान मोरे, छगन चौरे, सुनिल पारधी, राहुल पवार, श्रीकांत लवंगे, बळीराम मंडोेले, लक्ष्मण सोनवणे, सुरेश गोसावी, प्रविण पाटील, संतोष मोरे, सुनिल गिरासे, सुनिल सोनार, राहुल कुवर, राजेंद्र पाटील, रियाज कमरुद्दीन शेख, समाधान भिका मासुळे आदि मदतकार्य करीत आहेत.

कन्नड घाट किमान महिनाभरासाठी बंद ?

जोरदार पावसामुळे कन्नड घाटतील रस्त्यावर ठिकठिकाणी मातीचा मलबा व दगड कोसळलेले आहेत. म्हसोंबा मंदिराजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व दगड पडलेला असल्यामुळे त्याठिकाणाहुन चार ते पाच जेसीबीच्या साह्याने मलबा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर ठेकेदाराकडून सुरु आहे. तसेच मोठा दगड बाजूल करण्यासाठी वेळ लागणार आहे. दगड व पाण्यामुळे घाटातील रस्ता ठिक-ठिकाणी खचला असून कमजोर झाला आहे. त्यावर लगेच वाहतुक सुरु केली तर अजुन जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारात येत नाही. घाटात दुरुस्तीसाठी किमान महिनाभराचा कालवंधी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील किमान महिनाभर तरी घाटात वाहतुकीसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.

पाच म्हशींचा मृत्यू

कन्नड घाटातील रस्ता पावसामुळे बहूतांश ठिकाणी ठिसूळ झाल्याने, रस्ता खचून एक आयशर घाटातून खोल दरीत कोसळली असून या घटनेत आयशरचा चालक मरण पावला आहे. तर वाहक मात्र बचावला आहे. परंतू आयशरमध्ये असलेल्या पाचही म्हशींचा मृत्यू झाला आहे. मृत म्हशींना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफच्या दलाने प्रयत्न केलेत, परंतू ट्रक खाली सरकत असल्यामुळेे त्यांना परत माघारी यावे लागले. मृत म्हशींचा दुर्गंधी घाटातील म्हसोंबा मंदिर परिसरात पसरली आहे.

बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

- Advertisment -

ताज्या बातम्या