अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला दमदाटी
- Advertisement -
चाळीसगाव | मनोहर कांडेकर
चाळीसगाव नगर परिषदेचे पथक शहरातील आण्णाभाऊ साठे जलतरण तलावाच्या पाठीमागील डोगरी तितुर नदीच्या काठावरील अतिक्रमण काढण्याचे शासकीय काम करीत असतांना, सागर उर्फ सोमा दगड चौधरी याने मुख्याधिकार्यांसह कर्मचार्याना धक्काबुक्की करून अंगावर धावून जात शिवीगाळ गेल्याचा प्रकार घडला आहे.
तसेच यावेळी अतिक्रमण काढणान्या जेसीबीवर दगडफेकही करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला. याप्रकरणामुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली आहे.