Saturday, September 14, 2024
Homeजळगावचाळीसगाव : विद्यार्थ्यांसोबत उद्या पंतप्रधानांची ‘मन की बात’

चाळीसगाव : विद्यार्थ्यांसोबत उद्या पंतप्रधानांची ‘मन की बात’

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्ह्यातील एकमेव आयएसओ (iso) मानांकित नव बौद्ध मुलांची निवासी विद्यालय चाळीसगाव (chalisgaon) येथील विद्यार्थ्यांसोबत (students) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (Prime Minister Narendra Modi) मन की बात (Man Ki Baat) कार्यक्रमाव्दारे संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधणारे जगातील एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रम उद्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एकमेव आयएसओ मानांकित नव बौद्ध मुलांची निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे मन की बात कार्यक्रमातून संवाद साधण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक यांच्यासोबत खासदार उन्मेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष के.बी. साळुंखे, माजी.नगराध्यक्ष आशालता चव्हाण, जि.प.गटनेते पोपट तात्या भोळे, जिप सदस्य मंगला जाधव, माजी उपसभापती भाऊसाहेब पाटील, सर्व आजी माजी नगरसेवक, आजी माजी जि.प. व पस सदस्य, युवा मोर्चा व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, परिसरातील शक्ती केंद्र, बूथ प्रमूख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून आपण मन की बात कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन चाळीसगाव भाजपाचेे तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या