Friday, May 24, 2024
Homeजळगावघरफोडी करणारा चोरटा चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात

घरफोडी करणारा चोरटा चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शहारात मध्यरात्री घरफोडीच्या उद्देशानेे फिरत असलेल्या अटल चोरटा चाळीसगाव पोलिसांच्या गस्तीपथकाला मिळुन आला. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असाता, त्याचे जवळ सुमारे दिड फुट लांबीची लोखंडी टॉमी मिळुन आली. सदर इसमाविरोधात अभिलेख तपासला असता, भुसावळ बाजारपेठ येथे ३ घरफोडीचे गुन्हे तसेच जामनेर पो. स्टेशनला १ घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळुन आली आहे. चाळीसगाव पोलिसांना त्याला ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई केली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरीष्ठाच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत चाळीसगाव पोलिसांचेे पथक पेट्रोलिंग करीत असतांना, शहरातील पवारवाडी, हिरापुर रोड भागात राजहंस थिएटरसमोर एक इसम त्याचे चेहर्‍यावर रुमाल बांधुन संशयास्पद रित्या फिरतांना दिसला. व गस्त करीत असलेल्या पोलीसांना पाहुन अचानक अंधारात पळतांना दिसला. त्यावेळी गस्तीवर असलेले पोना. महेंद्र पाटील, पोना. भुषण पाटील, पोशि. रविंद्र बच्छे, पोशि.समाधान पाटील, पोशि. विजय पाटील, पोशि. राकेश महाजन, पोशि. आशुतोष सोनवणे, पोकॉ. पवन पाटील, पोकॉ. ज्ञानेश्वर पाटोळे यांनी लागलीच नियोजनबध्द रित्या सापळा रचुन आरोपी मोहम्मद फातीर उर्फ गोल्या मियातुबल मोहम्मद (वय१९) रा. इस्लामपुरा जामनेर ता. जामनेर यास ताब्यात घेतले व त्यास मध्यरात्री चाळीसगाव शहरात येणेबाबत विचारपुस करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व त्याची अंगझडती घेता त्याचे जवळ सुमारे दिड फुट लांबीची लोखंडी टॉमी मिळुन आली. सदर इसमाविरोधात अभिलेख तपासला असता भुसावळ बाजारपेठ येथे ३ घरफोडीचे गुन्हे तसेच जामनेर पो. स्टेशनला १ घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळुन आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पेालीस स्टेशनला पोकॉ रविंद्र बच्छे यांचे फिर्यादीवरुन गुरनं. ३४१/२०२३ महा. पोलीस कायदा कलम- १२२ प्रमाणे गु्न्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना० राहुल सोनवणे, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या