नाशिक | प्रतिनिधी Nashik
शहरातील मेहेर सिग्नल येथील रहदारीच्या चौकात तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रस्त्याची दुरवस्था समोर आली आहे. या रस्त्यावरील चेंबर खचल्याने मोठा खड्डा निर्माण झाला असून, गेल्या दहा दिवसांपासून हा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. या खड्ड्यामुळे अनेक नागरिक आणि दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून या ठिकाणी खड्डा कायम असून, मात्र, अद्यापही या खड्ड्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
.मेहेर सिग्नल येथील रहदारीच्या चौकात सहा महिन्यापूर्वीच केलेला स्मार्ट रस्ता; या रस्त्याचे चेंबर्स जुनेच चेंबर रस्त्यात खचले गेल्या दहा दिवसापासून खड्डा यात अनेक लोक पडले. अनेक गाड्या पडल्या प्रशासनाला अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या कोणी बघायला तयार नाही कोणी ऐकायला तयार नाही अधिकारी आनंदात दिवाळी करता येत फटाके फोडतात स्मार्ट सिटी चे स्मार्ट अधिकारी आनंदात आहे सगळीकडे आनंद आनंद, माझ्या नाशिककरांची दिवाळी मात्र खड्ड्यात आहे.
राजेंद्र बागुल – जेष्ठ नेते, काँग्रेस पक्ष




