Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता

राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकचे किमान तापमान 24.2 तर कमाल तापमान 39.5 सेल्सीअसवर आज होते. पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात ह्या दोन्हीही तापमानात मात्र हळूहळू वाढीचीच शक्यता असुन जन-जीवनाला या असह्य उष्णता व उकाड्याशीच चांगलाच सामना करावा लागणार आहे.

राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कोकणाबरोबर आता खान्देश व नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील 7 तालुके वगळता संपूर्ण पश्चिम-अर्ध महाराष्ट्रातील (मुंबईसह कोकण व नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच संपूर्ण मराठ वाडा)अशा 22 जिल्ह्यात आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि.4 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत आहे. असे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या