नंदुरबार Nsndurbar । प्रतिनिधी-
जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे (incessant rains ) जिल्हा जलमय झाला असून नदीकाठच्या (riverside villages) गावांना प्रशासनातर्फे (administration) सतर्कतेचा इशारा (warning to riverside villages) देण्यात आला आहे.
सुसरी प्रकल्पाची पाणी पातळी 154.85 मीटर
सुसरी लघू पाटबंधारे योजना नवलपूर, ता.शहादा धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 154.85 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 160 मीटर आहे. हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने गोमाई नदीच्या काठावरील टेंभली, लोणखेडा, मलोणी, उंटावद, तिखोरा, शहादा, पिंगाणे, धुरखेडा, मनरद, करझई, डामरखेडा, लांबोरा व इतर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आंबेबारा धरण पूर्ण क्षमतेने भरले
आंबेबारा, धनीबारा, विसरवाडी, खोलघर लघू प्रकल्प योजना धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सदर प्रकल्प 100 पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
येत्या 72 तासात अजून जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने आंबेबारा लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील आष्टे, पिप्रीपाडा, काळटोली, धनीबारा लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील अजेपूर, हरिपूर, अंबापूर, घोगळपाडा, विसरवाडी लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील विसरवाडी,नवापाडा, खर्जे,बंधारे केलपाडा, सोनारे, डोकारे, नवागांव तसेच खोलघर लघुप्रकल्पांच्या नदीकाठावरील खोलघर, हनुमंतपाडा, आमसपाडा, हरिपूर, सुतारपाडा, घोगळपाडा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरडी प्रकल्पात 95.75 मीटर पातळी
ढोंग लघू पाटबंधारे योजना धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 95.75 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्प 100 पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरडी नदीच्या काठावरील शिर्वे, वडदे, खातगांव, वडफळी, बिलदा, डोगेगाव, जामदा, वासदा, वहादे, चंदापूर, ढोंग, सागाळी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागन प्रकल्पाची पातळी 201.70 मीटर
नागन मध्यम प्रकल्प भरडू ता.नवापूर धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 201.70 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 205.73 मीटर आहे. पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने नागन नदीच्या काठावरील भरडू, तारपाडा, सोनारे, भांगरपाडा, बिलबारा, देवळीपाडा, दुधवे, नवागाव, महालकडू,बंधारे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सर्व प्रकल्पांच्या काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.