Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात काही ठिकाणी 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान गडगडाटासह पावसाची शक्यता

राज्यात काही ठिकाणी 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान गडगडाटासह पावसाची शक्यता

मुंबई | Mumbai

राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. यावर्षी अपेक्षापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सुरूवातीला दिलासादायक वाटलेला हा पाऊस नंतर अवकाळी बरसल्याने महाराष्ट्राच्या काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

के.एस.होसाळीकर यांनी म्हंटले आहे की, “2 ते 4 ऑक्तोबरमध्ये महाराष्ट्रात मुंबई, ठाणे सह पश्चिम किनारपट्टीवरील कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि नागरिकांनी वीजेच्या कडकडाटाबाबत अलर्ट्स मिळवण्यासाठी दामिनी अ‍ॅपचा वापर करावा.”

- Advertisment -

ताज्या बातम्या