Sunday, May 26, 2024
Homeनगरबँकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न

बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (Chanda) परीसरात पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला असून मंगळवारी रात्री सेंट्रल बँकेचे भरवस्तीत असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न (ATM Attempt to Break) ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे फसला. मात्र सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .

- Advertisement -

याबाबत बाळासाहेब जावळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चांदा-घोडेगाव रोडवर (Chanda Ghodegav Road) नदीजवळच बाळासाहेब एकनाथ जावळे यांचे पंचवटी कलेक्शनचे गाळे आहेत. त्यामध्ये मोबाईल शॉपी, जनरल स्टोअर्स, स्पेअर पार्ट या दुकानांच्यामध्ये सेंट्रल बॅकेंचे एटीएम (ATM) आहे.

नगर-मनमाड मार्ग दुरुस्त करून वाहतूक योग्य करा

मंगळवारी रात्री दोन ते अडिच वाजेदरम्यान रुख्मिणी स्वयंवर मंगल कार्यालयाच्या उत्तर बाजूच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत मंगल कार्यालयाच्या जाळीचे गज कापून एटीएमच्या जवळ आले. एटीएमचे (ATM) शटर तोडून आत प्रवेश केला आणि मशिन गॅसकटरसारख्या वस्तूने जाळून फोडण्याच्या प्रयत्न करत होते . त्याचवेळी त्यांच्यातील एक जण शेजारीच राहत असलेल्या बाबासाहेब जावळे यांच्या शेडला तेथून पहार घेऊन येत असताना मंगल कार्यालयाचे चालक दीपक जावळे घराबाहेर आले होते. त्यांनी त्याला पाहिले त्यांनी बाबासाहेब जावळे व तेथील वस्तीवरील सर्वांना फोन केले.

यापुढे सशुल्क पाससाठी साईभक्तांना आधार व मोबाईल नंबर बंधनकारक

मात्र नंतर काहीही हालचाल न दिसल्याने सर्व जण पुन्हा आपआपल्या घरात गेले. परंतु बाबासाहेब जावळे यांना संशय आल्याने ते पुन्हा बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला अंधारात उभे राहिले असता त्यांना बाळासाहेब जावळे यांच्या दुकानाजवळ काही जण दिसल्याने त्यांनी पुन्हा आपले पुतणे बाळासाहेब जावळे यांना फोन केला तेव्हा बाळासाहेब जावळे यांनी तातडीने आपला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता त्यांना एटीएममधून दोन जण बाहेर पडत असल्याचे निर्दशनास आले.

नगरमध्ये आणखी दोन उड्डाणपूल

तोपर्यंत वस्तीवरील सर्वजण जण जागे होऊन पंचवटी कलेक्शनच्या दिशेने पळाले. चोरट्यांना चाहूल लागताच त्यांनी धुम ठोकली. बाबासाहेब जावळे यांच्या म्हणण्यानुसार चार चोरटे एटीएम जवळ होते. त्यांनी मशिन जाळून फोडण्याचा प्रयत्न केल्याचे जावळे कुटुंबियांच्या लक्षात आले. बाळासाहेब जावळे यांनी सदर घटनेची खबर सोनई पोलिस स्टेशनला दिली. घटनेचे गार्भिय लक्षात घेत एपीआय माणिक चौधरी हे रात्रीच कॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, श्री. गावडे, श्री. आडकित्ते, झामरे, तमनर, वजीर शेख, पोलीस पाटील कैलास अभिनव आदिसह मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल होत चोरटयांना शोधण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशिन पुर्णतः जळालेले दिसत होते. बाहेरील पत्रा कापून तिजोरी फोडण्याच्या तयारीत असतानाच जावळे कुटुंबियाच्या जागरूकतेमुळे तिजोरी (Vault) वाचली. मात्र सदर घटनेने परीसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू; कुठे घडली घटना ?

सकाळी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, अहमदनगर स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी, ठसेतज्ञ यांनी घटनास्थळी भेट दिली. या संर्दभात सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता सदर घटनेचे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गणेश’च्या मदतीला आलो, काळजी करु नका – आ. थोरात

- Advertisment -

ताज्या बातम्या