सोनई |वार्ताहर| Sonai
नेवासा तालुक्यातील चांदा येथे गुन्हा करण्याच्या उद्देशाने दोघांकडे तलवारी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सोनई पोलिसांनी चांदा येथून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.
सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तलवारीबाबत माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी जावून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी छापा टाकला. शकुर अकबर शेख (वय 40) व संदीप गोविंद जावळे (वय 37) रा. चांदा ता. नेवासा या दोघांच्या ताब्यात प्रत्येकी एक तलवार मिळून आल्या. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोमनाथ झांबरे व कॉ.मच्छिंद्र आडकित्ते पुढील तपास करत आहे. हवालदार मच्छिंद्र आडकित्ते, पोलीस नाईक सोमनाथ झांबरे, वजीर शेख, विठ्ठल थोरात यांनी ही कारवाई केली आहे.