Tuesday, March 25, 2025
HomeनगरAhilyanagar : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

Ahilyanagar : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग

नगर तालुक्यातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे महामार्गालगत असलेल्या चंदन प्लास्टिकच्या गोडाऊनला (Chandan Plastic Warehouse Fire) रविवारी सकाळी भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत संपूर्ण गोडाऊनला वेधले. आगीत गोडाऊनमधील माल जळून खाक झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर मनपा (Ahilyanagar Manapa) व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या पथकाने (MIDC Fire Brigade) घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

- Advertisement -

आज सकाळी दहाच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोडाऊनमधून धुराचे लोट दिसताच अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग (Short Circuit Fire) लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...