Wednesday, May 29, 2024
Homeनगरचंदनापुरीच्या जुन्या घाटात आढळला तरुणीचा मृतदेह

चंदनापुरीच्या जुन्या घाटात आढळला तरुणीचा मृतदेह

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातून जाणार्या चंदनापुरीच्या जुन्या घाटामध्ये श्री गणपती मंदिराच्या पाठीमागे अंदाजे सोळा ते पंचवीस वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे ही घटना रविवार ता.( 24) सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे.तर तरूणीचा खून झाला असल्याचा संशय संगमनेर तालुका पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुपारी जुन्या चंदनापुरी घाटातील श्री गणपती मंदिराच्या पाठीमागे तरूणीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना समजली होती माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, सहायक पोलीस निरीक्षक इस्माईल शेख, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, अजय आठरे यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

सदर तरूणीचा खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तरूणीचा मृतदेह सात ते आठ दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. तसेच मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट देऊन प्रथमदर्शनी खुनाचा प्रकार असावा असा संशय व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या