Saturday, July 27, 2024
Homeनगरचंदनापुरी घाटात खून झालेली अल्पवयीन मुलीची ओळख पटली!

चंदनापुरी घाटात खून झालेली अल्पवयीन मुलीची ओळख पटली!

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जुन्या घाटामध्ये गणपती मंदिराच्या पाठीमागे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून केलेल्या अवस्थेत रविवारी दुपारी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र या अल्पवयीन मुलीची ओळख पटविण्यात तालुका पोलिसांना यश आले असून ही मुलगी संगमनेर शहरातील आहे. यामुळे आता तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जुन्या चंदनापुरी घाटातील गणपती मंदिराच्या पाठीमागे मुलीचा मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली होती. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, सहायक पोलीस निरीक्षक इस्माईल शेख, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, अजय आठरे यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सदर मुलीचा खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तसेच मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले होते.

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डमाळे, स्थानिक गुन्हे शाखा नगरचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, पोलीस नाईक गणेश भिंगादे, पो. नाईक. संतोष लोंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने तपास सुरू केला.

यामध्ये काही सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. सदर या अल्पवयीन मुलीची ओळख पटली असून ती संगमनेरातील एका उपनगरात राहत होती. अज्ञात इसमाने तिचे डोक्यात दगड घालून खून केला.

याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 633/ 2023 भारतीय दंड संहिता कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या