Thursday, July 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआंध्र प्रदेशात पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडूंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

आंध्र प्रदेशात पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडूंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

अभिनेते पवन कल्याण उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाने बहुमत मिळवले आहे. त्यानंतर आज चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. टीडीपीने ही निवडणुक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण (Pawan Kalyan) आणि भाजपाबरोबरच्या युतीत लढवली होती. यानंतर बहुमत मिळवल्यावर त्यांनी या तीनही पक्षांच्या युतीने आंध्रप्रदेशात सरकार स्थापन केले. त्यानंतर आज नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अभिनेते पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळ केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आज (१२ जून) सकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. या सरकारमध्ये टीडीपीच्या (TDP) २०, जनसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका मंत्र्यांनी मंत्रिपदाची (Ministership) शपथ घेतली आहे.

तसेच नायडू सरकारमध्ये एकूण २४ मंत्री असून चंद्राबाबू यांनी आंध्रप्रदेशचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर तेलगू देसम पक्षाने यंदा चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात १७ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसेच बाकीचे यापूर्वीही मंत्री राहिलेले आहेत. याशिवाय टीडीपी प्रमुखांनी एक पद रिक्त ठेवले असून नायडू यांच्या मंत्रिमंडळात (Cabinet) तीन महिलांना देखील संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या तेलुगू देशम पक्षाने माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला धूळ चारली आहे. या विधानसभा निवडणुकीत नायडूंच्या टीडीपीने १७५ पैकी १३५ जागा जिंकल्या. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीने २१ जागांवर विजय मिळवला. यासह भाजपाला आठ जागा जिंकता आल्या. या तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात १६४ जागा जिंकल्या. तर, जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसने केवळ ११ जागा जिंकल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या