Thursday, September 12, 2024
Homeनगरशिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला रहावा, कार्यकर्त्यांसह माझाही आग्रह

शिर्डी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला रहावा, कार्यकर्त्यांसह माझाही आग्रह

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आहे. याबाबत गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचेही मत प्रामुख्याने विचारात घेतले जाणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघ काँग्रेसला राहावा, हा कार्यकर्त्यांसह माझाही आग्रह आहे, कारण काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे.

- Advertisement -

संगमनेर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समवेत मतदार संघाचे आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, ज्ञानेश्वर गायकवाड, करण ससाणे, उत्कर्ष रूपवते, हेमंत ओगले, सचिन गुंजाळ, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र वाघमारे, अशोक कानडे, सोन्याबापू वाकचौरे, मीनानाथ पांडे, सुरेश थोरात, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत हांडोरे म्हणाले, खोटी आश्वासने देऊन भाजप पक्ष सत्तेत आला असून काँग्रेसला बदनाम केले जात आहे. उद्योग धार्जिणे धोरण राबवून भाजप जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद यांच्या माध्यमातून राजकारण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजप करत आहे. कोअर कमिटीच्या सुचनेनुसार महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांच्या जागांचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. यानुसार कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे प्राबल्य जास्त आहे. त्यानुसार जागांची विभागणी केली जाणार आहे.

याच माध्यमातून सामान्य जनतेत कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार पोहोचविला जाणार आहे. या बैठकांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांचाही आढावा घेतला जाणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाने लढवावा अशी कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मागणी आहे. निवडीबाबत आमदार बाळासाहेब थोरात व स्क्रीनिंग कमिटी मार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. पक्षात नवीन पदाधिकार्‍यांना संधी देण्यात येणार आहे. काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष असून सर्वसामान्यांचा विकास हीच पक्षाची विचारधारा आहे. देशात व राज्यात सध्या भाजप विरोधात परिवर्तनाची लाट सुरू असून महाराष्ट्रातून सर्वाधिक काँग्रेस खासदार निवडून देण्याचा मानस असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

आमदार लहू कानडे म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती आहे. भाजप जाणीवपूर्वक जातीयवादाचे राजकारण करत असून लोकशाहीसाठी हे धोक्याचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून येणार्‍या काळात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार असल्याचेही ते म्हणाले.

राजेंद्र नागवडे म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदार संघात अस्वस्थता आहे. काँग्रेस पक्षासाठी अनुकूलता आहे. काँग्रेस पक्षाने आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार द्यावा. शिर्डी लोकसभेत काँग्रेसचा उमेदवार दिल्यास पुन्हा नवचैतन्य निर्माण होईल.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या, शिर्डी लोकसभा मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छुक असून सदर उमेदवारी ही महिलांना देण्याबाबत विचार झाला पाहिजे. काँग्रेस पक्षाशी आपण कायम एकनिष्ठ असून पुढील काळातही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहू, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी करण ससाणे, हेमंत ओगले, ज्ञानेश्वर गायकवाड, उत्कर्षा रुपवते, समन्वयक सचिन गुंजाळ, ज्ञानदेव वाफारे, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, अर्चनाताई बालवाडे, आकाश नागरे, पंकज लोंढे, मीनानाथ पांडे, तुषार पोटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अजय फटांगरे, सुनंदाताई जोर्वेकर, पद्माताई थोरात, बेबीताई थोरात, के. के. थोरात, सुभाष सांगळे, सुधीर नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, रमेश गफले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कानवडे यांनी केले तर आभार सोमेश्वर दिवटे यांनी मानले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. तांबे यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये घ्या; जिल्हा काँग्रेस आढावा बैठकीत ठराव

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये संधी मिळावी अशी येथील कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे डॉ. तांबे यांना सन्मानाने काँग्रेसमध्ये घ्या, असा ठराव आज जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. यावर निरीक्षक हांडोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर मागणी प्रदेश काँग्रेसकडे कळवू, असे आश्वासन दिले.भागातील जनतेची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या